असत्याचे मळ बैसले ये
19.
असत्याचे मळ बैसले ये वाचे । ते न फिटती साचे तीर्थोदके ॥१॥
हरि नामामृत प्रक्षाळी जिव्हेते । पाणिये बहूते काय करिती ॥२॥
गंगासागरादी तीर्थे कोडीवरी । हरि नामाची सरी न पवती ॥३॥
हरीनाम गंगे सुस्नात पै झाला । नाम्या जवळी आला केशीराज ॥४॥
६५८
