तुमच्या संगतीचे काय
18.
तुमच्या संगतीचे काय सुख आम्हा । तुम्हा मेघश्यामा न कळे कांही ॥१॥
हीनत्व आम्हांसी हीनत्व आम्हांसी । हीनत्व आम्हांसी देवराया ॥२॥
गोड कधी न मिळेचि अन्ने । सदा लाजीरवाणे जगामध्ये ॥३॥
तुम्हांसी आनंद सुखाचा सोहळा । आमुचे कपाळा वोखटपण ॥४॥
चोखियाचा म्हणे कर्ममेळा देवा । हचि आमुचा ठेवा भागाभाग ॥५॥
