वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 24. संत बंका › 1. संत बंका अभंग गाथा › १. संत बंका ४० अभंग गाथा › १. संत बंका अभंग गाथा

कासया गा मज घातिले स

🙏 24. संत बंका · ABH-075662 · अभंग क्र. १७

17.
कासया गा मज घातिले संसारा । पाडिले विसरा तुमच्या नामा ॥१॥
कोठवरी हांव करितो दिवस राती । गुंतलोंसे भ्रांती माया मोहे ॥२॥
न कळे उकला करिता येरझारी । माझा मीच वैरी झालो दिसे ॥३॥
बंका म्हणे सुख संताचे संगती । ती मज विश्रांती द्यावी देवा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग