देवाचे गुणवर्णन करता
17.
देवाचे गुणवर्णन करतांना नामदेवाची समाधी.
युगा ऐसे पळ तुजविण जाय । पाहातोसी काय अंत माझा ॥१॥
कोमळ ह्लदय तुझे पंढरीच्या राया । कठिण सखया कैसे झाले ॥२॥
विचारिले चित्ती दुर्लभ हरिहरा । जाऊ कैसा घरा रंका-चीया ॥३॥
अंगिकारावरी अव्हेराची मात । नव्हे हे उचित देव-राया ॥४॥
मागे जे का आळी केली वासुदेवा । उदारा केशवा पुर-विला ॥५॥
नुपेक्षिसी आता भरंवसा चित्तास । आशेची निरास झाली दिसे ॥६॥
वांचोनिया दु:ख भोगावे म्या आताम । प्राणासी मुक्तता हेंचि भले ॥७॥
वर्णिता नामा झाला समाधिस्थ । जहाले विदित पांडुरंगा ॥८॥
