वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 12. संतांच्या विराण्या - विरहिणी अभंग › संत ज्ञानेश्वर महाराज विरहिणी

देवुनिया भेटी मजसी न

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073359 · अभंग क्र. १८

18.
देवुनिया भेटी मजसी न करी गोठी । लांचावला जीउ पाठी न राहे वो ।
निष्ठुर म्हणो तरी अपंगितो माते । व्यापचनि जीवाते उरी उरवितो ॥१॥
तो दाखवावो माये धरीन त्याचे पाये । तया लागी जीऊ आहे उतावेळु ॥२॥
भेटीचेनी सुखे मनचि होय मुके । ते रुप देखे परि बोलवेना ।
सगुण गुणाचा म्हणोनी घातली मिठी । तंव तो आपणिया समसाठी करुनी ठेले ॥३॥
काय नेणो कामाण कैसे वो जाले । चित्त चोरुनि नेले गोवळेने ।
बापरखुमादेविवर विठ्ठले अंग लपवुनी । चैतन्य चोरुनी नेले गे माये ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग