किती हे मरती किती हे
17.
किती हे मरती किती हे रडती । कि तिक हांसती आपआपणा ॥१॥
पाहता विचार काय हे खरे । खोट्या लागी झुरे प्राणी देखा ॥२॥
मरती ते काय रडती ते काय । हांसती ते काय कवण कवणा ॥३॥
कवण तो मेला कवण तो राहिला । हांसती रडती कवणाला न कळे कांही ॥४॥
सोयरा म्हणे याचे नवल वाटते । परि नाठविते देवा कोणी ॥५॥
