परमार्थ साधावा बोलती
18.
परमार्थ साधावा बोलती या गोष्टी । पुरी न ये हातवटी कांही त्यांची ॥१॥
शुध्द भक्तिभाव नामाचे चिंतन । हेचि मुख्य कारण परमार्था ॥२॥
निंदा दोष स्तुति मान अपमान । वमनासमान लेखा आधी ॥३॥
परद्रव्य परान्न परनारीचा विटाळ । मानावा अढळ परमार्थी ॥४॥
निर्मळा म्हणे हाचि परमार्थ । संतांचा सांगात दिननिशी ॥५॥
