वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 2. संत ज्ञानेश्वर निवडक अभंग

कान्होबा तुझी घोंगडी

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072832 · अभंग क्र. १९

19.
कान्होबा तुझी घोंगडी चांगली । आम्हांसी का दिली वांगली रे ॥धृ॥
स्वगत सच्चिदानंद मिळोनी शुद्ध सत्त्व गुण विणली रे ।
षडूगुण गोंडे रत्नजडित तुज श्यामसुन्दरा शोभली रे ॥१॥
काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभुतांनी विणली रे ।
रक्त रेतु दुर्गंधी जंतु नरक मुताने भरली रे ॥२॥
षडूविकार षडूवैरी मिळोनी तापत्रयाने विणली रे ।
नवा ठायी फाटूनि गेली ती त्वा आम्हांसि दिधली रे ॥३॥
ॠषी मुनी ध्याता मुखी नाम गाता संदेहवृत्ती विणली रे ।
बापरखुमादेविवरु विठ्ठले त्वत्पदी वृत्ति मुरली रे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग