फिराविली दोनी । कन्य
18.
फिराविली दोनी । कन्या आणि चक्रपाणि ॥१॥
झाला आनंदि आनंद । अवतरले गोविंद ॥२॥
तुटली बंधने । वसुदेव देवकीची दर्शने ॥३॥
गोकुळासी आले । ब्रम्हा अव्यक्त चांगंले ॥४॥
नंद दसवंती । धन्य देखिले श्रीपति ॥५॥
निशी जन्मकाळ । आले अष्टमी गोपाळ ॥६॥
आनंदली मही । भार गेला सकळही ॥७॥
तुका म्हणे कंसा । आट भोविला वोळसा ॥८॥
