वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 12. संत सेना न्हावी › 1. संत सेनान्हावींचा अभंग गाथा › 1. संत सेनान्हावि संपूर्ण अभंग गाथा एकूण अभंग 143 › 17. वासुदेव

वासुदेव

🙏 12. संत सेना न्हावी · ABH-073761 · अभंग क्र. १७

१७.
वासुदेव
१३३.
वासुदेव टळोनि गेले प्रहर तीन । काय निजता झांकोन लोचन ।
आलो मागावया दान । नका विन्मुख होऊ जाण गा ॥१॥
रामकृष्ण वासुदेवा । जाणवितों सकल जिवा ।
द्या मज दान वासुदेवा । मागुता फेरा नाही या गांवा गा ॥२॥
आलो दुरुनी सायास । द्याल दान मागायास ।
नका करू माझी निरास । धर्मसार फळ संसारास गा ॥३॥
एक भाव देवाकारणे । फारसें नलगे देणे घेणे ।
करा एकचित्त रिघा शरण । हेंचि मागणें तुम्हांकारणें गा ॥४॥
नका पाहू काळ वेळां । दान देई वासुदेवा ।
व्हां सावध झोपेला । सेना न्हावी चरणी लागला गा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग