वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 202. मुमुक्षुस उपदेश

तो देव स्मरारे अनंतु

🙏 4. संत नामदेव · ABH-082206 · अभंग क्र. २००३

2003.
तो देव स्मरारे अनंतु | जो का वैकुंठींचा नाथु |दृढ धरा रे हृदयांतु | तेणे यमपंथु चुकेल ॥१॥
आकांती द्रौपदिये स्मरिला | तिची वस्त्रे आपणचि जाला |सभेमाजी मान रक्षिला | काळ मे जाला कौरवांचा ॥२॥
विमलार्जुन उन्मळिला | जरासंध तोहि मारिला |कंसासुर निर्दाळला | कान्हया जाला गोकुळींचा ॥३॥
रुव जेणे अढळपदी बैसविला | नामे एके अजामेळ उद्धरिला |उत्तरेचा गर्भ रक्षिला | ते सोडविला परीक्षिती ॥४॥
जाति कुळ न पाहसी | नामे एके उद्धरिले गणिकेसी |त्या गोपाळाचे उच्छिष्ट खासी | गज सोडविसी पाणियाडे ॥५॥
ऐसा तू कृपाळु गा देवा | प्रसन्न जालासि पांडवा |विष्णुदास नामा विनवी केशवा | प्रेमभाव द्यावा मजलागी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग