एके हाती टाळ एके हात
2009.
एके हाती टाळ एके हाती दिडी | म्हणा वाचे उदंडी रामनाम ॥१॥
श्रीहरिसारिखा गोसावी पै चांगु | फेडिला पै पांगु जन्मांतरिचा ॥२॥
तैसे नृत्य करी वेडे बागडे | वदन वाकुडे करूनिया ॥३॥
चुकले पाडस कुरंगिणि गिवसिती | तैसा हृषिकेशी न्याहाळी तूते ॥४॥
धेनु पान्हाय हुंबरे वत्साते | तैसा वोरस तूते केशिराज ॥५॥
नामा म्हणे इतुके न करवे निर्देवा | तरी वाचेसि केशवा उच्चारी पा ॥६॥
