केशव म्हणता जासी केश
1999.
केशव म्हणता जासी केशवपंथे | त्याहुनि सरते आणिक नाही ॥१॥
वेद का पढसी शास्त्र का सांगसी | उदंड वाचेसी हरी म्हणता ॥२॥
पहा याहुनिया आन नाही सार | भीष्मे युधिष्ठिर उपदेशिला ॥३॥
नामा म्हणे धरी केशवी विश्वास | तरसी गर्भवास नामे येके ॥४॥
