संसार बंधन केले जेणे
2023.
संसार बंधन केले जेणे शून्य | तयासी अनन्य शरण रिघा ॥१॥
मायबाप सखा विठ्ठल विसांवा | त्याचे पायी ठेवा सदा मन ॥२॥
निजबोधरूप तोचि ज्ञानदीप | आनंदस्वरूप बाप माझा ॥३॥
नामा म्हणे त्याचे संगतीचा वारा | पावे पैल पारा हेळामात्रे ॥४॥
