वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

संसारकूपीं हरि पडिये

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086688 · अभंग क्र. २००५

2005.
संसारकूपीं हरि पडियेलों श्रीहरीं लाहुनी पै शरीर । एका पिसे लागे कांहींएक न करवें पंचभूतिक विकार ।
सुष्ट दुष्ट कर्मे करिता हे शिणलें मळमुत्र दोष जर्जर । ऐसिया जीवातें उद्धरसी म्हणोनी दोष जर्जर । ऐसिया जीवते उद्धरसी म्हणोनी ब्रीद साजे रघुवीर ॥१॥ यालागी रामचंद्रा रामचंद्रा हृदयींक धरिली नाममुद्रा॥धृ०॥आशा तृष्णा दोन्ही स्नेहाळ नागिणी कामक्रोध हे विकार । त्यांचिया संगति विषयवृद्धि जाली लहरी दुःख दरिद्र । इंगळाचे शेजे अंथुरितां वरी तिकडिया अरुवार । ऐसा हा संसार जाणोनी दुस्तर ठाकियेलें तुझे द्वार ॥२॥कौळींके रुप कपटी धरियेले ते त्वा साचार केले । साभिमान्या देव गुरुचक्रवर्ती त्रिभुवनींयश थोरले । पांखीरु वाचिया लोभाकारणें गणिकेसी कैवल्य दिधले । दंभ प्रपंच वोळगंता जीव तया तु सायुज्य देती आपुलें ॥३॥श्रीवत्स ब्राह्मणें झालासी पामरा आता तुं ते पद मिरवीसी दातार । चरणस्पर्शे त्वा अहिल्या उद्धरिली विस्मयो थोर सुरनरां । जे गती देवकिये तैसीच पुतनें विश्राम एका वो वरा । तुझे मुद्रांकित न भीयें कळिकाळा तुं स्वामीं सारंगधरा ॥४॥वनीं सिंहाचें भय दाखविले जसा जे बैसविली गजस्कंधीं । परमपुरुषा तुझे नाम उच्चारिता वोळंगताती ऋद्धिसिद्धि । उपमन्या आरतें क्षिरसिंधु दिधली येवढी प्रसन्नबुद्धी । न गणितां रावणु शरणागतु केला लंका निरोपली आंधीं ॥५॥नर सुर किन्नर पन्नग यक्ष त्रासियलें संसारे । जाणोनि शुकदेव गर्भी स्थिरावला भयाभीत बोले उत्तरें । जननीयेच्या कष्टा निष्कृती व्हावया उपदेश केला दातारें । जीवन्मुक्त शुक मुनिजनां वरिष्ठ जपतांची ध्यानीं दोन अक्षरे ॥६॥
ऐसा सहस्त्रमुखें वर्णिता नातुडसी गा देवा धांडोळिता सिद्ध पंथ । जगदबंधु दीनानाथ समुद्धरण द्रौपदीचा वेळाईत । सुदामियांच्या दो पोह्माकारणें स्नेहें पसरिसी हात । एका जनार्दनी जवळीं बोलउनी उच्छिष्ट प्रसाद देत ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग