सर्वसुखाची उघडली खाण
2018.
सर्वसुखाची उघडली खाणी । श्रीमुख नयनी पाहता ॥१॥
मोक्षसुख आम्हा न लगे गा देवा । विश्रांतीसी ठेवा आणिकासी ॥२॥
धनसुख मज कासया हे पोटी । पाहिजे लंगोटी सर्वभावे ॥३॥
स्त्रीसुख संसार कासया वेरझार । नको हा पसर मज देवा ॥४॥
एका जनार्दनी नाशिवंत सुख । पाहता तुझे मुख इच्छा पुरती ॥५॥
