गुण दोष त्याचे म्हणत
2010.
गुण दोष त्याचे म्हणता श्लाघिजे | निर्वासन कीजे चित्त आधी ॥१॥
गाऊ नाचू आम्ही आनंदे कीर्तनी | भुक्ति मुक्ति दोन्ही मागो देवा ॥२॥
मनाची पै वृति बुडे प्रेमडोही | नाठवती देही दुजा भाव ॥३॥
सगुणी निर्गुणी एकचि आवडी | चित्ती दिली बुडी चिदानंदी ॥४॥
नामा म्हणे देवा मागणे ऐसी सेवा | द्यावी जी केशवा जन्मोजन्मी ॥५॥
