वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

उल्लंघिली लाज । तेणे

🙏 3. संत तुकाराम · ABH-078102 · अभंग क्र. २००५

2005.
उल्लंघिली लाज । तेणे साधियेले काज ॥१॥
सुखे नाचो पैलतीरी । गेलो भवाचे सागरी ॥धृ॥
नामाची सांगडी । सुखे बांधिली आवडी ॥२॥
तुका म्हणे लोका । उरली वाचा मारी हाका ॥३॥

अर्थ :
आम्ही परमार्थ प्राप्ती साठी लाज भयाचेही उल्लंघन केले आहे. ते लाज सोडल्यामुळे आमचे कार्य प्राप्त केले आहे आम्ही भव नदी तरून पार गेलो आहे व सुखाने नाच आहोत आणि ते केवळ हरी नामाच्या छदाणेच. तुकाराम महाराज म्हणतात आता आमचे कार्य संपले आहे आणि आता फक्त लोकांना परमार्थ मार्गाला लागा असे हाक मारण्यासाठीच हि वाचा कामाला लागली आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग