वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

आम्हा वैष्णवाचा । ने

🙏 3. संत तुकाराम · ABH-077971 · अभंग क्र. २००४

2004.
आम्हा वैष्णवाचा । नेम काया मने वाचा ॥१॥
धीर धरु जिवासाठी । येऊ नेदू लाभा तुटी ॥धृ॥
उचित समय । लाज निवारावे भय ॥२॥
तुका म्हणे कळा । जाणो नेम नाही बाळा ॥३॥

अर्थ :
आमचा वैष्णवाचा असा नियम आहे कि काय वाचा मानाने परमार्थासाठी आम्ही स्वतःचा प्राणही अर्पण करू. पण स्वहिता मध्ये कधीही अंतर पडू देणार नाहि. किंवा उचित प्रसंगा मध्ये आम्ही आमची लाज सोडण्यास भयभीत होणार नाहि. तुकाराम महाराज म्हणतात जे नियम आम्ही जाणतो आहोत ते अज्ञानी माणसांना नियम माहित नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग