वैद्य एक पंढरिराव ।
2017.
वैद्य एक पंढरिराव । अंतर्भाव तो जाणे ॥१॥
रोगाऐशा द्याव्या वल्ली । जाणे जाली बाधा ते ॥धृपद॥
नेदी रुका वेचो मोल । पोहे बोल प्रीतीचे ॥२॥
तुका म्हणे दयावंता । सदा चिंता दीनांची ॥३॥
अर्थ :
सर्वांच्या मनातील (अंतकरणातील) भक्तिभाव जाणणारा एक वैद्य पंढरीनाथच आहे. रोगी कोणत्या प्रकारचा आहे, त्याला कोणत्या प्रकारच्या औषधी, कोणत्या प्रकारच्या वनस्पती द्यावे लागतील हे पंढरी राव सर्व जाणतो व रोगाची बाधा ही तोच जाणतो. रोग्याकडून रोग बरा करण्याचा हा पंढरीराव एक रुपयादेखील मोल घेत नाही केवळ भक्ताने प्रेमाने हरिकीर्तन करण्याचीच तो वाट पहात असतो. तुकाराम महाराज म्हणतात या दयावंत हरीला सदा सर्वदा दीन दुर्बळ भक्तांची चिंता असते
