नित्य नेम आम्हा चिंत
2008.
नित्य नेम आम्हा चिंतन श्रीरामा | आणिका त्या नेमा नेघो नेघो ॥१॥
वळंघो हरि भूतभाव निर्धारी | दिसे चराचरी हरिरूप ॥२॥
जे जे पडे दृष्टी आणिक नाही सृष्टी | हरिरूपी भेटी हेंचि दिसे ॥३॥
नामा म्हणे विठ्ठल सर्वाभूती आहे | आणिक उपाय न लगती ॥४॥
