वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 202. मुमुक्षुस उपदेश

सर्व जिवा करी कारुण्

🙏 4. संत नामदेव · ABH-082233 · अभंग क्र. २०२७

2027.
सर्व जिवा करी कारुण्य | वाचे सत्य उच्चारण |नित्य नामस्मरण | तोचि दास भगवंताचा ॥| १|धन्य धन्य भूमंडळी | धन्य धन्य साधुवचन पाळी |वेदमर्यादा वेगळी | कार्ये न करी सर्वथा ॥२॥
प्रातःकाळी उठुनी | नरहरिनाम उच्चारूनि |उभा राहुनि कीर्तनी | जय जय नामे गर्जतसे |॥३॥
देवभक्ति आवडे ज्यासी | पुण्यप्रारब्ध म्हणती त्यासी|जो उपजोनि आपुले वंशी | पूर्वजांसि उद्धरितो ॥४|तीथे एक भावभजन | नित्य सत्य ते पिंडदान |भूतदया ते भागीरथी स्नान | तेथ जनार्दन उभा असे ॥५॥
देखिलिया ब्राह्मण | वेदांसमान देत मान |यथाशक्ति करूनि दान | अतिथिपूजन जो करी ॥६॥
नामा म्हणे तोचि तरे | वैकुंठ तेथे उतरे|तीर्थे म्हणती तो त्वरे | पाहो दृष्टी एकवेळ ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग