ब्रह्म ते ब्राह्मण श
2028.
ब्रह्म ते ब्राह्मण श्रुतिचे वचन | सर्व नारायण सर्वाभूती ॥१|चह शिक्षाजनी गुरु चाऱ्ही वर्ण | प्रत्यक्ष पुराणे साक्ष देती ॥२॥
हेळसुनी निदी दुरावी ब्राह्मणा | सभेमाजी जाणा दुऱ्हाविती ॥३॥
त्याचे पाप नाही खंडन सर्वथा | म्हणोनि अनंता भय वाटे ॥४॥
कोपला प्रहार ब्राह्मणा मारिला | लक्ष वेडावली भूषण त्या ॥५॥
क्रोध अग्निज्वाळा झगडती जेथे | न उरत्ती तेथे काडिमात्रे ॥६॥
उगेंच ब्राह्मणा सांबे छळियेले | सर्व शांत जाले आपोआप ॥७॥
अपेक्षिति कोण्ही तेंचि ते होते | न बोलावे तेथे बोल काहो 1 ८॥अग्निसी लहान थोर ने म्हणावा | पडे परिस्वाहा संव कांहो ॥६॥
|मा्केडेय बुद्धि छळुनि ब्राह्मण | आयुष्य ते उणे होय माझे ॥१०॥
ब्राह्मणाचे वीर्य मातंगीचे पोटी | त्याचि एका गोष्टी आशिर्वाद ॥१९॥
आयुष्याचे कल्प सात चौदा होती | ऐकोनि विश्रांति कौतेनाने |॥१२॥
धन्य गोत वित्त स्त्रिया आणि पुत्र | सर्व व्हावे हित त्राह्मणाते ॥१३॥
कुळक्षयो व्हावे ऐसे वाटे जीवा | ब्राह्मणासी दावा नको वापा ॥१४॥
नामा म्हणे ऐसे धन्य ते ब्राह्मण | धरिले चरण माथा त्यांचे ॥१५॥
