वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

कल्पतरूखाली । फळे ये

🙏 3. संत तुकाराम · ABH-078017 · अभंग क्र. २०१२

2012.
कल्पतरूखाली । फळे येती मागीतली ॥१॥
तेथे बैसल्याचा भाव । विचारूनि बोले ठाव ॥धृपद॥
द्यावे ते उत्तर । येतो प्रतीतीचा तो फेर ॥२॥
तुका म्हणे मनी । आपुल्या च लाभहानि ॥३॥

अर्थ :
कल्पतरू वृक्षाच्या खाली बसून आपण जे फळ मागू ते आपोआप येते. तेथे बसणाऱ्या चा भक्ती भाव हा शुद्ध असला पाहिजे आणि जे योग्य आहे तेच विचार करून मागितले पाहिजे तरच आपल्याला ते फळ मिळते. मग आपण जे काही मागू ते आपल्याला एका नंतर एक प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात आपण आपल्या मनामध्ये ज्याप्रमाणे चांगल्या वाईट गोष्टींची इच्छा कल्पतरूच्या वृक्षाखाली करतो त्याप्रमाणे आपल्याला लाभ हानी होते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग