वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 202. मुमुक्षुस उपदेश

तप थोर देखिले संसारी

🙏 4. संत नामदेव · ABH-082196 · अभंग क्र. २०१४

2014.
तप थोर देखिले संसारीं| जो अखंड कीर्तन करी |त्याच्या तपा पुढारिले हरी | हे निर्धारे जाणा हो ॥१॥
धन्य धन्य विष्णुदास | ऐसा हरिनामी सौरस |ते पितरांसहित वैकुंठ | सर्वकाळ श्रमिती ॥२॥
जप तप ज्ञान विठ्ठल | तयासि नाही काळवेळ |टाळी वाजवितांचि निर्मळ | महादोष हरतील ॥३॥
जेथे रामकृष्ण उच्चार | सकळ मंत्रांत मंत्रसार |पांचाहि वदनी शंकर | नित्य रामनाम जपतसे ॥४॥
तो हा पुंडलिके उभा केला | आपण दृष्टीसमोर बैसला |कीर्तने त्रैलोक्य तारिला | स्वानंदाने पितरांसहित ॥५॥
न लगे करावे यज्ञयाग | न लगे आणिक मंत्रलाग |एक सेविलिया पांडुरंग | अनंत तीर्थे घडतील ॥६॥
पंचक्रोशी प्रदक्षिणा | नित्य नमस्कारी विठ्ठल चरणा |तरी घडेल पृथ्वीप्रदक्षिणा | कोटीच्या कोटी अनंत ॥७॥
सप्तपुरी द्वादश लिंगे | कीर्तने डोलती लागवेगे |ऐसे भक्त तारिले पांडुरंगे | विटेवरी उभा नीट राहोनी ॥८॥
नामा सांगे गुह्य गोष्टी विठ्ठल तारक एक सृष्टी |पंढरी देखिलिया दृष्टी | वैकुंठपद पाविजे ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग