वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

बैसलोंसे दारी । धरणे

🙏 3. संत तुकाराम · ABH-078029 · अभंग क्र. २००६

2006.
बैसलोंसे दारी । धरणे कोंडोनि भिकारी ॥१॥
आता कोठे हालो नेदी । बरी सांपडली संदी ॥धृपद॥
किती वेरझारा । मागे घातलीया घरा ॥२॥
माझे मज नारायणा । देता का रे नये मना ॥३॥
भांडावे ते किती । बहु सोसिली फजिती ॥४॥
तुका म्हणे नाही । लाज तुझे अंगी काही ॥५॥

अर्थ :
मी तुझ्या दरी भिकारी होऊन तुला कोंडून ठेवण्या साठी बसलो आहे आता मी तुला येथून कोठेही हलू देणार नाही. आता हि चांगली संधी सापडली आहे आता पर्यंत आम्ही तुझ्या दरी कितीतरी हेलपाटे घातले आहे. हे पांडुरंग माझेच मला देण्याविषयी तू इतका का बरे संकोच करतोस? तुझ्याशी कटी भांडावे हे समजत नाही आज पर्यंत जन्म मरणाची फजिती किती आम्ही सोसली आहे? तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तुला थोडी देखील लाज कशी नाही. आम्हाला आता विन्मुख पाठवून तुला काहीच बरे वाटत नाही?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग