जागा रे गोपाळांनो रा
2005.
जागा रे गोपाळांनो रामनामी जागा | कळिकाळ अंकणा महादोष जाती भंगा ॥१॥
सहस्रदळ समान अनुहत ध्वनि उठी| नामाचेनि बळे पापे रिघाली कपाटी ॥२॥
दशमी एक व्रत करी दिंडी दरुशन | एकादशी उपवास तुम्ही जागा जागरण ॥३॥
द्वादशी साधन कोटिकुळे उद्धरती | नामा म्हणे केशव ठाव देईल वैकुंठी ॥४॥
