आम्हा नादीं विठ्ठलु
2028.
आम्हा नादीं विठ्ठलु छंदीं विठ्ठलु । हृत्पदी विठठलु मिळतसे ॥१॥
आम्हा धातुं विठ्ठलु मातु विठ्ठलु । गातुं विठ्ठलु आनंदे ॥२॥
आम्हा राग विठ्ठलु रंग विठ्ठलु । संग विठ्ठलु वैष्णवांचा ॥३॥
आम्हा ताल विठ्ठलु मेळ विठ्ठलु । कल्लोळ विठ्ठलु कीर्तने ॥४॥
आम्हा श्रुति विठ्ठलु श्रोता विठ्ठलु । वक्ता विठ्ठलु वदनी ॥५॥
आम्हा मनी विठ्ठलु ध्यानीं विठ्ठलु । एका जनार्दनी अवघा विठ्ठलु ॥६॥
