भीष्मासि आपण पाडियले
2020.
भीष्मासि आपण पाडियले रणी | गोविंद निर्वाणी भेटी दिल्ही ॥१॥
कर्ण विदारिला अर्जुनाच्या बाणी | गोविंद निर्वाणी भेटी दिल्ही ॥२॥
हरिश्चंद्र वाहे डोंबाघरी पाणी | गोविंदे निर्वाणी भेटी दिल्ही ॥३॥
परीक्षितो वैसे मरण आसनी | गोविंदे निर्वाणी भेटी दिल्ही ॥४॥
नामा म्हणे तुम्ही देव धरा मनी | गोविंद निर्वाणी भेटी देई ॥५॥
