नामामृत सरिता पवित्र
2007.
नामामृत सरिता पवित्र हरिकथा | त्रिभुवनींच्या तीर्था मुगुटमणि ॥१॥
तेथे माझ्या मना होई क्षेत्रवासी | राहे संतापाशी सुख घेत ॥२॥
अहिक्य परत्र समतीरी साजिरी | परमानंद लहरी हेलावति ॥३॥
मुक्तीची माउली मोक्षाची गाउली | शिणल्या साउली विषयासक्ता ॥४॥
तेथे सनकादिक प्रेमळ सकळ | राहिले निश्चळ करुनि चित्त ॥५॥
नामा म्हणे माझे सखे हरिजन | तारू त्याचे चरण दृढ धरा ॥६॥
