चित्ती नाही आस । त्य
2024.
चित्ती नाही आस । त्याचा पांडुरंग दास ॥१॥
असे भक्तांचिये घरी । काम न सांगता करी ॥धृपद॥
अनाथाचा बंधु । असे अंगी हा संबंधु ॥२॥
तुका म्हणे भावे । देवा सत्ता राबवावे ॥३॥
अर्थ :
ज्याच्या चित्तात कोणत्याही प्रकारची इच्छा नाहीये त्याचा पांडुरंगच दास होतो. अशा भक्ताच्या घरी तो देव राहतो आणि त्याच्या मनातील ओळखून त्याने कोणतेही काम न सांगता देव त्याचे सर्व काम करतो. कारण तो अनाथांचा बंधू आहे अशी ब्रीदे त्याच्या संपूर्ण अंगी आहे. तुकाराम महाराज म्हणतात भक्तीभावाचा असा हा महिमा आहे की देवावर देखील भक्त सत्ता करतो एवढेच नाही तर देवाला आपल्या घरी सुद्धा राबून घेतो.
