निर्वाणींची हे सांगि
2006.
निर्वाणींची हे सांगितली खूण । कैबल्य चरण विठो-बाचे ॥१॥
वेद शास्त्र स्मृति वदती पुराणे । पाहूनि जाणणे हेंचि सत्य ॥२॥
क्रिया कर्म धर्म ज्यालगि करणे । ते खूण निर्वाण हेंचि असे ॥३॥
जप तप अनुष्ठान का करिजे साधन । तेंचि प्रत्यक्ष निधान हेंचि असे ॥४॥
नामा ह्मणे मज कळले अनुभवे । न सोडी हे जीवे चरण तुझे ॥५॥
