दुर्बळाचे कोण । ऐके
2009.
दुर्बळाचे कोण । ऐके घालूनिया मन । राहिले कारण । तयावाचूनि काय ते ॥१॥
कळो आले अनुभवे । पांडुरंगा माझ्या जीवे । न संगता ठावे । पडे चर्या देखोनि ॥धृपद॥
काम क्रोध माझ्या देही । भेदाभेद गेले नाही । होते तेथे काही । तुज कृपा करिता ॥२॥
हे तो नव्हे उचित । नुपेक्षावे शरणागत । तुका म्हणे रीत । तुमची आम्हा न कळे ॥३॥
अर्थ :
तू दुर्बलाचे गहृाने कधी मान्रावर घेऊन ऐकणार? त्यावाचून तरी थोरांचे काय अडले आहे? हे पांडुरंगा, हे माझ्या अनुभवावरुनच मला समजले आहे तुंम्ही जरी सांगितले नाही तरी हे मला कळून आहे तेही तुमची चर्या पाहून, कारण माझ्या अंतःकरणातील काम, क्रोध, भेद जो पर्यंत गेले नाहीत तो पर्यंत तू कृपा करून तरी उपयोग काय होणार? तुकाराम महाराज म्हणतात देवा, पण तुम्ही शरण आलेल्यांची उपेक्षा करू नये कारण ते तुम्हाला शोभणार नाही असे मला वाटते पण तुझी रीत तुझी पद्धत काय आहे ते आम्हला काळात नाही.
