एक विठ्ठल वदता वाचे
2030.
एक विठ्ठल वदता वाचे । आणिक साचे नावडती ॥१॥
बैसलासे ध्यानीं मनी । विठ्ठलावांचुनीं दुजे नेणे ॥२॥
जावे तिकडे विठ्ठल भरला । रिता ठाव नाही उरला ॥३॥
एका जनार्दनी भावे । विठ्ठल म्हणता पाठी धांवें ॥४॥