ब्रम्हरस घेई काढा ।
2015.
ब्रम्हरस घेई काढा । जेणे पीडा वारेल ॥१॥
पथ्य नाम विठोबाचे । अणीक वाचे न सेवी ॥धृपद॥
भवरोगाऐसे जाय । आणीक काय क्षुल्लके ॥२॥
तुका म्हणे नव्हे बाधा । अणीक कदा भूतांची ॥३॥
अर्थ :
तु ब्रम्ह रसाचा काढा घे म्हणजे त्याने काय होईल तर तुझे जन्ममरणाची पिडा कायम स्वरुपी नाश पावेल. या औषधाचे पथ्य म्हणजे विठोबाचे नाम आहे त्यावाचून तु दुसरे काहीही सेवन करू नकोस. अरे या ब्रम्ह रस काढ्याणे भव रोग नाहीसा होतो तर तेथे किरकोळ रोग काय आहेत? तुकाराम महाराज म्हणतात केवळ ब्रम्ह रस काढ्याणे तुला कोणत्याही प्रकारच्या भुतांची कधीही बाधा होणार नाही.
