नलगे भुक्तिमुक्ति नल
2003.
नलगे भुक्तिमुक्ति नलगे स्वर्गवास । नको वैकुंठावास देवराया ॥१॥
नलगे योगयाग अष्टांग साधन । न चुकें बंधन येणे कांही ॥२॥
नलगें इष्टमित्र सोईरें संबंधी । नको ही उपाधी पाठी लावूं ॥३॥
एका जनार्दनी चुकवोनी पाल्हाळ । करी मज मोकळें गुरुराया ॥४॥
