हरीस श्रवणी ध्यावो न
2021.
हरीस श्रवणी ध्यावो नित्य तुम्ही | ठसावेल ध्यानी अवघा राम जनी बनी ॥१॥
नयनी सखा पहा कृष्ण न्याहाळुनी | प्रकाशले तेज रवि गेला रूपोनि ॥२॥
हरिचरणी लावी मन दर्शन | जालिया जाती त्रिविधताप हरपोन ॥३॥
तुळसीचा सुगंध मस्तकी धरा | नामा म्हणे चरण दृढ धरा ॥४॥
