व्यर्थ का हव्यास करि
1945.
व्यर्थ का हव्यास करिसी परोपरी | नाम निरंतरी न म्हणा का रे ॥१॥
आयुष्य जाईल क्षणांत सरोन | पावसी पतन कुंभिपाकी ॥२॥
नाम संकीर्तन नाइके स्वभावे | प्रत्यक्ष ते शव जगामाजी ॥ ३ |
नामा म्हणे ऐसे गेले बहुतेक | सांगे सकळिक हेंचि आता |॥४॥
