विठ्ठलाचे पाय धरोनिय
1955.
विठ्ठलाचे पाय धरोनिया राहे | मग संसार ते काय करील तुझे ॥१॥
संसाराचे भय नाही हरिचे दासा | विठु आम्हा सरिसा निरंतर ॥२॥
निरंतर बसे हरि भक्तापाशी विसंबेना त्यासी कदाकाळी ॥३॥
नामा म्हणे ऐसा विठ्ठल सोडोनि | वेथ काय जनी शिणताती ॥४॥
