संसार करिता देव जे स
1959.
संसार करिता देव जे सांपडे | तरि का जाले वेडे सनकादिक ॥१॥
संसारी असता देव जरी भेटता | शुकदेव कासया जाता तया लागी ॥२॥
घराश्रमी जरी जोडे परब्रह्म | तरी का घराश्रम त्याग केला ॥३॥
जातीच्या आचारे सांपडे जरी सार | तरी का निरहंकार जाले साधु ॥४॥
नामा म्हणे आता सकळ सांडोन | आलो शरण विठोवासी ॥५॥
