आलेनो संसार सोडवणे क
1962.
आलेनो संसार सोडवणे करा | शरण जा उदारा पांडुरंगा ॥१॥
प्रपंच न सरे कदा कल्पकोडी | वासनेचि बेडी पडे पायी ॥२॥
व्यर्थ मायादेवी गर्भवास गोवी | नश्वर भोगावी नाना योनी ॥३॥
नामा म्हणे पाहा विचारूनि मनी | स्मरावा निर्वाणी पांडुरंग ॥४॥
