वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 200. जनास उपदेश

भूमिदाने होसी भूमिपा

🙏 4. संत नामदेव · ABH-082316 · अभंग क्र. १९३५

1935.
भूमिदाने होसी भूमिपाळु | कनकदाने कांति निर्मळु |चंदनवाने सदा शितळु | जन्मोजन्मी प्राणिया ॥१॥
अन्नदाने दृढायुषी | उदकदाने सदासुखी |मंदिरदाने भुवन पालखी | सुपरिमळु उपचार ॥२॥
वस्त्रदाने सुंदरपण | तांबूलदाने मनुष्यपण |गोपीचंदने ब्राह्मणपण | अतिलावण्य सुंदरता ॥३॥
जे वृक्ष लाविती सर्वकाळ | तयावरी शस्त्राचे झल्लाळ |जे ईश्वरी अर्पिती फळ | पुत्रवंत होऊनी नांदती ॥४॥
ऐशा दानांच्या पंक्ति | वेगळाल्या सांगो किती |एका ध्या रे लक्ष्मीपति | विष्णुदास नामा म्हणे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग