माझे मन राहो तुझे पा
1951.
माझे मन राहो तुझे पायी । वास पंधरीचा देई ॥१॥
जन्न्म देशी भलते परी । वाचे राम विठ्ठलहरी ॥२॥
जन्मासी या भिणे । हे तो आम्हा लाजिरवाणे ॥३॥
मोक्ष मुक्तिंतें देवा । नको गोऊं तयाठाया ॥४॥
म्हणे जनार्दनी एका । संतसंग द्यावा निका ॥५॥
