एकी एकादशी करिता काय
1936.
एकी एकादशी करिता काय वेंचे | उपवासी राहता काय वेंचे ॥१॥
एक तुळसीदळ वाहता काय वेंचे | पाऊली वंदिता काय वेंचे ॥२॥
तुज जागरणा जाता काय वेंचे | हरि हरि म्हणता काय वेंचे ॥३॥
संतसमागमा जाता काय बेचे | चरणरज वंदिता काय वेंचे ॥४॥
एक दंडवत करिता काय वेंचे | अपराधी म्हणविता काय वेंचे ॥ ५ |
एक प्रदक्षिणा करिता काय वेंचे | तीर्थयात्रेसी जाता काय वेंचे ॥६॥
ऐसि निमोली भक्ति का न करिसी निदैवा | नामा म्हणे केशवा अनुसर पा ॥७॥
