वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

कैं मनींची इच्छा पुर

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086807 · अभंग क्र. १९४२

1942.
कैं मनींची इच्छा पुरेल ही धांव । पाहीन पंढरीराव जाऊनिया ॥१॥
आलीया जन्माचें होईल सार्थक । निवारेल दुःख भव पीडा ॥२॥
कैं हे मस्तक ठेवीन चरणी । पाहीन डोळे भरुनी श्रीमुख ते ॥३॥
एका जनार्दनी कैं होईन पात्र । नासेल समस्त तापत्रय ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग