वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

आम्ही दीन तू दीनानाथ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086675 · अभंग क्र. १९४५

1945.
आम्ही दीन तू दीनानाथ । तिही लोकी तुझी मात ॥१॥
आम्ही पतित तू पावन । ऐसे साजे नामभिधान ॥२॥
आम्ही अनाथ तू कैवारी । ऐसे तुझी आहे थोरी ॥३॥
आम्ही दीन तू वत्सल । ऐकीला तो ऐसा बोल ॥४॥
नको धरु दुजे आता । कृपाळु तू दीनानाथा ॥५॥
एका शरण जनार्दनी । ऐसे चालत आले दुरुनी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग