स्वप्नींचिया परी देख
1953.
स्वप्नींचिया परी देखिसी अभ्यास । न धरीच विश्वास चित्त तुझे ॥१॥
वांझेचिया स्तनी अमृताची धणी । मृगजळ पाणी तान्हा बोले ॥२॥
तरी प्रेमावीण फळती क्रियाकर्म । हाता येती वर्मे विठोबाची ॥३॥
दृष्टीते देखणे श्रवणी ऐकणे । मनाचे बैसणे एक होय ॥४॥
नामा ह्मणे तरीच विठो येऊन भेटे । कावळ पालटे कैवल्य होय ॥५॥
