बाळपणी वर्षे बारा |
1957.
बाळपणी वर्षे बारा | ती तुझी गेली रे अवधारा |ते तू धांवसी सैरा | खेळाचेनि विनोदे ॥१॥
म्हणोनि आहेस नागर तरुणा | तंव वोळगे रामराणा |आलिया म्हातारपणा | मग तुज कैचि आठवण ॥२॥
तुज भरली अठरा | मग तू होसी निमासुरा |पहिले पंचविसाच्या भरा| झणे गव्हारा भुललासी ॥३॥
आणिक भरलिया सात पांचा | मग होसी महिमेचा |गर्वे खिळेल तुझी वाचा | देवा ब्राह्मणाते न भजसी ॥४॥
त्वचा मांस शिरा जाळी | बांधोनि हाडांची मोळी |लेखितोसि सदाकाळी | देहचि रत्न आहे माझे ॥५॥
बहु भ्रम या शिराचा रे| म्हणे मी मी तारुण्याचा भरे |ऐसा संशय मनाचा रे | तू संडी रे अज्ञाना ॥६॥
माथवीये पडे मासोळी | ते म्हणे मी आहे प्रबळ जळी |तैसी विषयाच्या पाल्हाळी | भुललासी गव्हारा ॥७॥
तुज भरलिया साठी | मग तुझ्या हाती येईल काठी |मग ती अडोरे लागती | म्हणती बागुल आला रे ॥८॥
म्हणती थोर रे म्हातारा | कानी झालासि बहिरा |कैसे न ऐकसी परिकरा | नाम हरि हराचे ॥९॥
दातांची पाथी उठी | मग चाववेना भाकर रोटी |नाक लागले हनुवटी | नाम होटी न उच्चारये ॥१०॥
बैसोनि उंबरवादिया तळवटी | आया बाया मांगती गोष्टी |म्हणती म्हातारा बैल दृष्टी | कैसा अक्षय जाला से ॥११॥
खोकलिया येतमा कारा | म्हणती रांडेचा म्हातारा |अझूनि न जाय मरणद्वारा | किती दिवस बांचेल ॥१२॥
ऐसा जाणोनि अवसर | वोळखा वेगे सारंगधर |विष्णुदास नामयाचा दातार | वर विठ्ठल पंढरिये ॥ १३
