निंदील हे जन सुखे नि
1938.
निंदील हे जन सुखे निंदू द्यावे | सज्जनी क्षोभावे नये बापा ॥१॥
निंदा स्तुति ज्याला समान मे जाली | त्याची स्थिति आली समाधिसी ॥२॥
शत्रु मित्र ज्याला होती समानत्वे | तोचि मे देवाते आवडला ॥३॥
माती आणि सोने ज्या भासे समान | तो एक निधान योगिराज ॥४॥
नामा म्हणे भक्त ऐसे जे असती | तेणे पावन होती तिन्ही लोक ॥५॥
