संपत्ती संतती मजला न
1946.
संपत्ती संतती मजला नावडे । स्वरुप आवडें तुझे देवा ॥१॥
तुझ्या रुपी सुख माझिया लोचना । आणिक नारायणा न पाहती ॥२॥
हस्त इच्छिताती तुज भेटावया । सेवाहि कराया सर्व काळ ॥३॥
चित्त जडले पायी सदा सर्वकाळ । राहिली तळमळ तयाची ते ॥४॥
एका जनार्दनी तुझे नाम मुखी । नको अणिका सुखी गोवुं मज ॥५॥
